Take a fresh look at your lifestyle.

‘मोदी सरकारने ब्रेक दुरुस्तीऐवजी थेट होर्नचा आवाज वाढवला..’; थरूर यांची टीका

केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यावर आता शेअर बाजाराने याचे उत्साहात स्वागत केले आहे. मात्र, अनेक सरकारी कंपन्या विकल्या जाणार असल्याने डाव्या संघटनांनी यावर टीका केली आहे. तर, ‘मोदी सरकारने ब्रेक दुरुस्तीऐवजी थेट होर्नचा आवाज वाढवला..’ अशी टीका काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केली आहे.

Advertisement

थरूर यांनी म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर मला एका गॅरेजच्या मॅकेनिकची गोष्ट आठवते. तुमच्या गाडीचा मी ब्रेक दुरुस्त करू शकलो नाही. त्यामुळे तुमच्या गाडीच्या हॉर्नचा आवाज वाढवून दिला आहे, असं हा मॅकेनिक सांगत असतो. केंद्र सरकारचा बजेट असाच काहीसा आहे.

Advertisement

एलआयसीत आयपीओ आणणार असल्याचंही जाहीर केलं. एलआयसीत आयपीओ आणल्यानंतर शेअर्स विकण्यात येईल, असं सीतारामन म्हणाल्या. सरकारने विमा कंपनीत परदेशी गुंतवणूक करण्यासही परवानगी दिली आहे. एफडीआयची मर्यादा आता 74 टक्के करण्यात आली आहे. ही मर्यादा आधी 49 टक्के होती. त्याशिवाय बँकेची रखडलेली कर्ज प्रकरणे मार्गी लावण्यासाठी बॅड बँकेची स्थापना करण्यात येणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply