दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.
केंद्राने घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. त्यामुळे रिअल इस्टेटला चालना मिळण्याची शक्यता आहे. निर्मला सीतारामन यांनी सेक्शन 80EEA अंतर्गत मिळणाऱ्या दीड लाखांपर्यंत अतिरिक्त सूटची मर्यादा १ वर्षापर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या योजनेचा फायदा ३१ मार्च २०२२ पर्यंत ग्राहकांना घेता येणार आहे.
दरम्यान पेट्रोलवर 2.50 रुपये आणि डिझेलवर 4 रुपये इतका कृषि सेस लावणार असल्याचे अर्थमंत्री सीतारमण यांनी सांगितले. मात्र यावेळी सीतारमण यांनी स्पष्ट केले आहे की, याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. असे असले तरी विविध वरिष्ठ आणि अनुभवी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाढलेल्या सेसचा ग्राहकांवर नक्कीच परिणाम होणार आहे. म्हणजे इंधनाच्या दरात नक्कीच वाढ होण्याची शक्यता आहे.
परवडणाऱ्या घरांसाठी सरकारने २०१९ मध्ये सेक्शन 80EEA लागू केला होता, याअंतर्गत Repayment वर दीड लाखांपर्यत अतिरिक्त सूट मिळत होती, ही सूट सेक्शन २४ बीच्या वेगळी होती, घरकर्जाच्या व्याजावरील पेमेंटवर प्रत्येक वर्षी २ लाखापर्यंत सूट मिळत होती, सरकारने यंदाच्या बजेटमध्ये परवडणाऱ्या घरांच्या योजनेत कोणताही बदल केला नाही.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स