Take a fresh look at your lifestyle.

अखेर ‘एअर इंडिया’बाबतचा निर्णय झालाच; बीपीसीएलबाबतही झालाय निर्णय पक्का

सरकारी हवाई वाहतूक सेवा ‘एअर इंडिया’ कंपनी खासगी कंपन्यांना देण्याची महत्वाची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला कोरोना यांनी केली आहे. तसेच भारत पेट्रोलिअम कंपनीचे काही टक्के खासगी क्षेत्रासाठी खुले करण्याची महत्वाची घोषणाही त्यांनी केली आहे.

Advertisement

६० हजार कोटींचे कर्ज एअर इंडियावर असल्यामुळे कंपनीच्या विक्रीचा निर्णय होण्याची शक्यता होतीच. त्यावर आज अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. एअर इंडियाच्या खासगीकराच्या घोषणेनंतर सभागृहात विरोधकांकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Advertisement

आंतरराष्ट्रीय मार्गांवरील विमानांचे अत्याधुनिकीकरण करण्यात एअर इंडिया कमी पडली. २००४ मध्येही एअर इंडियाकडून बी ७४७ आणि ए ३१० विमानांचा वापर सुरू होता. कित्येक दशके कंपनी हीच विमाने वापरत होती. याशिवाय एअर इंडियाला भ्रष्टाचार आणि ढिसाळ व्यवस्थापन यांचा प्रचंड मोठा फटका बसला आहे. पुढे इंडियन एअरलायन्स ही कंपनी २०११ मध्ये यात विलीनीकरण केल्यावर खऱ्या अर्थाने ‘एअर इंडिया’चे बुरे दिन गतिमान झाले. अखेरी आता ही कंपनी पुन्हा खासगी होत आहे.

Advertisement

१९३२ मध्ये एअर इंडियाची स्थापना झाली. उद्योगपती जे. आर. डी. टाटांनी स्थापन केलेल्या एअरलाईन्सचे सुरुवातीचे नाव ‘टाटा एअरलाईन्स’ होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने टाटा एअरलाईन्सचे राष्ट्रीयकरण केले. १९५३ मध्ये सरकारने टाटा एअरलाईन्स ताब्यात घेतली. त्यावेळी तिचे नावही बदलण्यात आले होते.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply