‘त्या’ कारणामुळे मोबाइलच्या किमती महागणार; सोन्या-चांदीच्या किमती घसरणार; वाचा, काय आहे कारण
दिल्ली :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.
आताच हाती आलेल्या माहितीनुसार, मोबाइलच्या किमती महागणार आहेत. मोबाइलसारख्या वस्तूंवर लागणार्या कस्टम ड्यूटीवर 2.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. असे असले तरी सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी करण्यात आली आहे. एवढेच नाही तर स्टील या धातूवरीलही कस्टम ड्यूटी कमी करण्यात आली आहे.
अर्थमंत्री सीतारमण या आज वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. यामध्ये चालू आर्थिक वर्षाचा सरकारचा महसूल आणि खर्च याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. खरंतर, अनेक लोक अर्थसंकल्पाच्या प्रतिक्षेत असता. कारण, याचा टॅक्सवर मोठा परिणाम होतो.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स