दिल्ली :
अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी अर्थमंत्री पूर्णपणे पेपरलेस म्हणजेच डिजिटल बजेट सादर करीत आहेत. 2021 टॅब्लेटद्वारे बजेट सादर केले जाते. शेतकरी, कामगार ते सामान्य करदात्यांपासून तर छोट्या-मोठ्या व्यावसायिकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेटवर आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणादरम्यान शेअर बाजारावर कमालीचा बदल दिसून आला आहे. गुंतवणूकदारांची बजेटसह शेअर मार्केटवरही नजर आहे. सलग 6 दिवस घसरणीनंतर आज बाजारात चांगली खरेदी सुरु झालेली आहे. सेन्सेक्स जवळपास 950 अंकांनी वधारून 47250 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर निफ्टीही 250 अंकांच्या वाढीसह 13900 च्या जवळपास व्यापार करीत आहे. अर्थसंकल्पातून बाजाराला जास्त अपेक्षा आहेत. कोरोना व्हायरस या साथीच्या आजारामुळे अर्थव्यवस्थेचा दबाव असताना अशावेळी बजेट सादर केले जात आहे.
अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकारने अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. इन्फ्रा आणि आरोग्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याशिवाय ग्रामीण क्षेत्राबाबतही घोषणा केल्या जात आहेत. अशा क्षेत्रांना दिलासा देण्याचा प्रयत्न आहे, ज्यांचा कोरोना विषाणूच्या साथीवर जास्त परिणाम झाला आहे. सध्या बँका, वित्तीय आणि रिअल्टी क्षेत्र हे शेअर बाजाराला आधार आहेत.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!