शरद पवारांचे ‘नरो..वा.. कुंजुरोवा..’च; पहा कॉर्पोरेटच्या मुद्द्यावर नेमके काय म्हटलेय त्यांनी
मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कृषी सुधारणा विधेयकाच्या मतदान प्रक्रियेपासून अलिप्तता नेमकी कोणत्या अर्थाने आहे याचे कोडे अजूनही सुटलेले नाही. कारण, यावर त्यांच्या पक्षाने आंदोलनात उडी घेतलेली असतानाही पवार साहेबांनी ठोस विरोध अजूनही दाखवलेला नाही. त्यातच आज केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना दिलेल्या प्रत्युत्तरात पवारांनी भूमिका मांडताना सुनावले आहे.
मात्र, त्यात त्यांनी हे कायदे कॉर्पोरेटधार्जिणे असल्याचे अजिबात म्हटलेले नाही. त्यांनी याबाबत म्हटले आहे की, कॉर्पोरेट क्षेत्राशी व्यवहार करताना शेतकर्यांना योग्य भाव मिळण्याबाबत दीर्घकाळ आश्वस्त केले गेलेले नाही. माननीय केंद्रीय कृषिमंत्री लोकांपर्यंत यासंबंधात योग्य तथ्ये समोर आणत नाहीत. नव्या यंत्रणेत या मंडी व्यवस्थेवर परिणाम होणार नाही, असं आश्वासन केंद्रीय कृषिमंत्री देत आहेत. परंतु प्रत्यक्षात नव्या कायद्यातील तरतूदी कॅार्पोरेट क्षेत्राच्या हितासाठी केल्या गेल्या आहेत असं शेतकरी संघटनांचं मत बनलं आहे. ते बदलणं आवश्यक असेल तर तर शेतकर्यांना दिलासा देण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. योग्य चर्चा वेळेवर व्हायला हवी होती.
एकूणच कृषी सुधारणा विधेयकातील तरतुदी कॉर्पोरेटधार्जिण्या असल्याचे शेतकऱ्यांच्या संघटनांचे म्हणणे आहे असेच यात स्पष्ट म्हटलेले आहे. कायद्याच्या तरतुदी कॉर्पोरेटधार्जिण्या असल्याचे पवार साहेब किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांचे असे अजिबात म्हणणे आहे की नाही हेच यातून सूचित होत नाही.
तथ्ये जनतेसमोर सादर करण्याची पद्धत योग्य अथवा अयोग्य ही चर्चा दीर्घ काळ लांबवता येईल. परंतु सत्य सत्वर समोर मांडणे तेवढेच महत्त्वाचे आहे. सरकारच्या वतीने हे काम केवळ सन्माननीय केंद्रीय कृषीमंत्रीच करू शकतात, असेही पवारांनी त्यात म्हटले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर