Take a fresh look at your lifestyle.

‘अण्णा हजारे मॅनेजेबल व हास्यास्पद व्यक्ती..’; डॉ. मुणगेकरांनी नेमके काय म्हटलेय पहा

मुंबई :

Advertisement

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, त्यांनी आंदोलन स्थगित कारुण्याची घोषणा करतानाच दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा न देता वेगळी भूमिका मांडली आहे. त्यामुळे अण्णांवर देशभरातून टीका होत आहे. ज्येष्ठ अर्थतज्ञ आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे.

Advertisement

त्यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणावर कोरडे ओढतानाच देशाच्या अर्थसंकल्पात काहीही ठोस पुढे येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. तसेच अण्णा हजारे यांच्यावर टीका केल्याची बातमी सामना या शिवसेनेच्या मुखपत्राने प्रसिद्ध केली आहे.

Advertisement

त्यात म्हटले आहे की, अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व असल्याचे मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. अण्णा म्हणजे महात्मा गांधी नव्हेत. अण्णांचे बोलविते धनी आता समोर आले असून अण्णा विश्वास न ठेवण्याजोगे आणि मॅनेजेबल असल्याचा घणाघातही मुणगेकर यांनी यावेळी केला.

Advertisement

एकूणच अण्णा हजारे यांच्या एकूण आंदोलन आणि मागण्यांवर डॉ. मुणगेकर यांनी अशा पद्धतीने प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे आता यावर अण्णा हजारे किंवा त्यांचे कार्यकर्ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply