अहमदनगर :
WhatsApp आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असते. मात्र यावेळी WhatsApp ने नव्याने आणलेल्या प्रायव्हसी पॉलिसी युजर्सला रुचल्या नाहीत. परिणामी या प्रायव्हसी पॉलिसीविरोधात युजर्सने बंड केले आणि युजर्स पर्याय म्हणून टेलेग्राम आणि सिग्नलकडे वळाले. त्या दरम्यान अनेक लोकांनी व्हाट्सप सोडले. याचा झटका व्हाट्सपला मोठ्या प्रमाणात बसला.
अशातच आता एक सर्वे समोर आला आहे. सायबर मीडियाने हा सर्वे केला असून याचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. तब्बल २८ टक्के युजर्स आता व्हॉट्सअॅपचा वापर बंद करणार असल्याच्या विचारात आहेत. सध्या मात्र व्हॉट्सअॅपने आपली प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्याचा विषय पुढे ढकलला आहेत. त्यामुळेही हे २८ टक्के युजर्स अद्यापही व्हॉट्सअॅप वापरत आहेत.
सायबर मीडियाने समोर आणलेल्या सर्वेची मुद्देसूद माहिती :-
- ४९ टक्के युजर्स यावरून नाराज झाले आहेत.
- ४५ टक्के युजर्सने व्हॉट्सअॅपवर विश्वास ठेवला आहे.
- ३५ टक्के युजर्संनी ब्रीज ऑफ ट्रस्ट म्हणजेच विश्वास तोडल्याचे म्हटले आहे.
सर्वेत भाग घेणाऱ्या युजर्समध्ये ४१ टक्के टेलिग्राम आणि ३५ टक्के युजर सिग्नलवर शिफ्ट होत आहेत. व्हॉट्सअॅपवर फिशिंग अटॅकची शक्यता ५२ टक्के आहे. तर टेलिग्राम साठी ही २८ टक्के आहे, अशी माहिती सर्वेमध्ये समोर आली आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट