Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : सुशांत सिंगच्या ‘त्या’ नातेवाईकावर गोळीबार; प्रकृती चिंताजनक, ‘अशी’ घडली घटना

दिल्ली :

Advertisement

बॉलीवूडमध्ये आपले नाव कायमचे कोरून गेलेला आणि आज आपल्यात नसलेला हरहुन्नरी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या नातेवाइकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अद्यापही सुशांत प्रकरणाचा निकाल पूर्णपणे समोर आलेला नाही. अशातच त्याच्या जवळच्या नातेवाइकासोबत ही घटना घडली आहे.

Advertisement

या गोळीबार घटनेत सुशांतचा मावसभाऊ राजकुमार सिंह गंभीर जखमी झालेला आहे. त्याच्यावर भरचौकात गोळ्या झाडण्यात आल्या. सुशांत सिह राजपूतचा मावस भाऊ राजकुमार सिंह हा यामाहा मोटारसायकल शोरूमचा मालक आहे.  बिहारमधील सहरसा, सुपौल आणि मधेपूरा या तीन जिल्ह्यात त्याचं यामाहा मोटारसायकल शोरुम्स आहेत.

Advertisement

राजकुमार हे दररोज मधेपूरा येथील शोरूम उघडण्यासाठी जात असायचे. आजही ते मधेपूरा येथे शोरूम उघडण्यासाठी जात होते. दरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला आहे. या हल्ल्यात राजकुमार सहीत त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. यामध्ये सहकारी अली हसनची प्रकृती चिंताजनक आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply