Take a fresh look at your lifestyle.

तर गुन्हे दाखल करणार; बर्ड फ्लूविषयी राज्य सरकारने दिले ‘ते’ आदेश

मुंबई : (प्रेसनोट)

Advertisement

अंडी व चिकन हा प्रथिनसंपृक्त आहार आहे. ते पूर्णपणे उकडून खाणे सुरक्षित असून, बर्ड फ्लूबाबत गैरसमज निर्माण करणाऱ्या अफवा कुणी पसरवल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

Advertisement

अमरावती पोल्ट्री फार्म असोसिएशनतर्फे दस्तुरनगरातील गुणवंत हॉलमध्ये आयोजित जनजागृतीपर कार्यक्रमात त्या बोलत होत्या. असोसिएशनचे डॉ. शरद भारसाकळे,  आकाश खुरद, माजी महापौर विलास इंगोले, सुनील झोंबाडे, सुरेखाताई लुंगारे, बाबासाहेब रावणकर, डॉ. राजेंद्र महल्ले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय रहाटे, डॉ. सचिन बोंद्रे, राजीव भोजने यांच्यासह अनेक मान्यवर व विविध पोल्ट्रीधारक यावेळी उपस्थित होते.

Advertisement

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, चिकन- अंडी योग्य पद्धतीने शिजवल्यास पूर्णपणे सुरक्षित आहे. शिवाय, ते खाल्ल्याने इम्युनिटी वाढते. शरीराला प्रथिनांची गरज असते. संसर्गाशी लढण्याशी ताकद अंडी व चिकनमधून मिळते. त्यामुळे अंडी या आहाराचा पोषण आहार योजनेतदेखील शासनाने समावेश केला आहे. या उत्कृष्ट व प्रथिनयुक्त अन्नाबाबत विनाकारण कुणीही गैरसमज पसरवू नयेत.

Advertisement

अफवांमुळे पोल्ट्रीधारक बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी मी पशुसंवर्धन मंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्याबाबत पाठपुरावा करून निश्चित तोडगा काढला जाईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

Advertisement

बर्ड फ्लूबाबत गैरसमज पसरून पोल्ट्रीधारकांचे नुकसान होते. व्यवसाय व रोजगाराची हानी होते. कोरोनाकाळात तर नियमित चिकन अंडी खाऊन प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे. दणकट आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे कुठलाही गैरसमज न बाळगता तंदुरूस्तीसाठी नियमित अंडी- चिकन खाण्याचे आवाहन श्री. खुरद, श्री. भारसाकळे व विविध पोल्ट्रीधारकांनी केले. निवेदिका क्षिप्रा मानकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Advertisement

यानिमित्त आयोजित स्नेहभोजनात अंडी व चिकनच्या प्रथिनयुक्त चवदार पदार्थांचा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आस्वाद घेऊन हे अन्न पूर्णतः सुरक्षित असल्याचा दाखला दिला.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply