Take a fresh look at your lifestyle.

जय शाह यांच्या पत्राचा परिणाम; क्रिकेट बोर्डाने घेतला ‘तो’ महत्वाचा निर्णय

मुंबई :

Advertisement

भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे सचिव जय शाह यांनी लिहिलेल्या पत्राला सर्व राज्य क्रिकेट संघटनांनी उत्तर दिले आहे. त्यानुसार यंदा रणजी ट्रॉफी ही क्रिकेट स्पर्धा होणार नाही. त्याच्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटसाठी फ़क़्त दोन महिने शिल्लक असल्याने विजय हजारे ट्रॉफी हीच स्पर्धा आजोजित केली जाणार आहे.

Advertisement

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अर्थात बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की, रणजी ट्रॉफीच्या जागेवर या हंगामात विजय हजारे ट्रॉफी आयोजित केली जाईल. कोरोनाने देशातील यंदा स्पर्धेचे वेळापत्रक पूर्ण बिघडले आहे. एप्रिलमध्ये आयपीएलचा हंगाम सुरू होणार असल्याने बीसीसीआयकडे कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेसाठी फ़क़्त दोन महिने शिल्लक आहेत. हे सर्व लक्षात घेऊन बीसीसीआयने विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीपैकी कोणतेही एक आयोजित करण्याबाबत सर्व संघटनांकडून मत मागितले होते. त्यानुसार रणजी स्पर्धा रद्द केली जात आहे.

Advertisement

मंडळाचे सचिव जय शाह यांनी राज्य संघटनांना पत्र लिहून या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपल्यासाठी महिला स्पर्धा असणे खूप महत्वाचे आहे. घरगुती हंगामात 2020-21 च्या आपल्या प्रतिसादावर आधारित हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

संपदान : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply