अहमदनगर :
शेतकऱ्यांना सेवा कमी आणि अडवणूक करण्यात पुढे असलेल्या महसूल विभागाला अखेरीस जाग आली आहे. त्याला निमित्त ठरले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा आमदार रोहित पवार. कारण, त्यांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन आता पोटखराबा जमीन रेकॉर्डवर येण्याचा मार्ग खुला झाला आहे.
कर्जत-जामखेड भागातील शेतकऱ्यांनी रोहित पवार यांचे या मुद्द्याकडे लक्ष वेधले होते. त्यानुसार त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे याबाबत पाठपुरावा केला. त्यामुळे अखेरीस जिल्हाधिकारी कार्यालयाला जनतेची ही मागणी आणि भावना समजली आहे.
त्यानुसार आता पोटखराबा क्षेत्र 7/12 उताऱ्यावर लागवडीयोग्य जमीन म्हणून जोडले जाण्याचा मार्ग खुला झाला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयाकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर महसूल विभागाचे कर्मचारी आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी मिळून यावर पुढील कार्यवाही करणार आहेत. लागवडयोग्य क्षेत्र म्हणून हे जोडले जाईल.
याबाबतची कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. मार्च 2021 अखेरीस ही कार्यवाही करण्याचे त्यात म्हटले आहे. मात्र, जबाबदारी नावाच्या गोष्टीचे उच्चस्तरीय भान असलेली ही सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांना याप्रकरणी कितपत सहकार्य करते की, पुन्हा आडमुठी भूमिका ठेऊन अडवणूक करीत राहते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्यामुळे’ वाढणार कार प्राईस; पहा नेमका काय फायदा-तोटा होणार सामान्यांना
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव