Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी आता ठाकरे सरकारच्या मानगुटीवरच बसणार’; चंद्रकांत दादांनी केली मोठी घोषणा

सोलापूर :

Advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत (दादा) पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जहरी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकार मुद्द्याला बगल देऊन वेगळ्याच विषयाकडे नेऊन नागरिकांची दिशाभूल करीत आहे.

Advertisement

ते म्हणाले की, मूळ मुद्दा सोडून नवीन वेगळाच विषय काढून मूळ मुद्द्याला सरकार बगल देते. विषयच गाडून टाकण्याचे प्रकार राज्य सरकार करत अाहे. त्यामुळे अाता त्यांच्या मानगुटीवर बसल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीची भरपाई अाणि धनंजय मुंडे या विषयांवर शासनाला धारेवर धरणार आहोत.

Advertisement

यावेळी अामदार विजय देशमुख, अामदार सुभाष देशमुख, पक्षाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख असे तिन्ही देशमुख त्यांच्यासाेबत हाेते. दादा म्हणाले की, २ लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती. पण त्याचे निम्मे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात अालेले नाहीत. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्राेत्साहन अनुदान देण्याचाही पत्ता नाही. २ लाखांच्या वरील रकमेसाठी एकरकमी परतफेड याेजनाही फसवीच निघाली. पीक विमा कंपन्यांनी याेजना नाकारली असतानाही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही.

Advertisement

शेतकऱ्यांसंबंधी शेकडो महत्त्वाचे विषय असताना, राेज वेगळाच एक नवीन विषय काढून लाेकांचे लक्ष विचलित करणे आणि मूळ मुद्द्याला बगल देण्याचे काम महाविकास आघाडीचे सरकार करीत आहे. मराठा अारक्षणाच्या तर चिंध्याच झाल्या. अाेबीसी अाणि मराठ्यांमध्ये संघर्ष निर्माण केला, असाही आरोप दादांनी केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply