येत्या दहा वर्षांत भारतीय शेअर बाजारात अमेरिकेपेक्षा मिळणार जास्त पैसे, बिनधास्त करा गुंतवणूक ; ‘या’ जगप्रसिद्ध गुंतवणूकदाराचा सल्ला
दिल्ली :
जागतिक स्तरावरील प्रसिद्ध ग्लोबर गुंतवणूकदार मार्क फेबर यांच्या म्हणण्यानुसार, येत्या 10 वर्षात भारतीय शेअर बाजार अमेरिकन शेअर बाजारापेक्षा अधिक पैसे कमवू शकेल. ईटी नाऊला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितले. मार्कच्या मते, इतर बाजारापेक्षा जास्त गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास भारत सक्षम आहे. गुंतवणूकदारांना अजूनही भारतात चांगली संधी दिसत आहेत.
मुलाखतीदरम्यान, फेबर यांनी पीएनबी घोटाळ्याच्या प्रश्नावर सांगितले की, पीएनबी घोटाळा होऊनही मी माझे पीएनबी शेअर्स विकणार नाही. जरी या घोटाळ्यामुळे निश्चितच भारतीय शेअर बाजाराचे नुकसान झाले आहे. मात्र तरीही मार्केट करेक्शन अजून तितकेसे संवेदशीनल नाही.
ग्लोबार ट्रेड वॉरच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन प्रशासनाने चीनी वस्तूंच्या आयातीवर 60 बिलियन डॉलर्स आकारले आहेत. मार्कच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयानंतर चीनपेक्षा अमेरिकेचे अधिक नुकसान होईल.
ग्लोबल ट्रेड वॉरच्या अंदाजाने अमेरिका आणि चीनसह जगभरातील शेअर बाजार हादरले आहेत. एजन्सी रॉटरच्या वृत्तानुसार, एमएससीई इंडेक्सवर आशिया पॅसिफिक शेअर्स जपानच्या बाहेर सलग चौथ्या दिवशी लाल निशेनच्या खाली राहिले. एजन्सीने पुढे म्हटले आहे की 2016 च्या पहिल्या तिमाहीपासून अशी घट दिसून आली आहे. अमेरिकेतील किंमतीतील वाढ हे त्याचे मुख्य कारण आहे.
सप्टेंबर 2017 मध्ये मार्क फॅबर यांनी अंदाज लावला होता की, पुढील काही महिन्यांत अमेरिकेच्या शेअर बाजारात 30-40 टक्के घसरण होईल. सप्टेंबर 2017 मध्ये सीएनबीसीला दिलेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी असे म्हटले होते की, गुंतवणूकदार सध्या स्टॉक खरेदी करण्याकडे पहात आहेत, कारण त्यांना बाजारातील अडचणी समजत नाहीयेत. या घसरणीमागे एखादी क्रेडिट इव्हेंट किंवा एखादी मोठी फसवणूक उघडकीस येऊ शकते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट