Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘त्यांनी’ केला विरोध; झाली झटापट, पोलीस व आंदोलक जखमी, एकाला अटक

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘महत्वाकांक्षी’ कृषी सुधारणा विधेयकाच्या विरोधात सुरू असलेले आंदोलन पुन्हा एकदा आणखी जोरात सुरू झालेले आहे. अशावेळी आंदोलकांनी आंदोलन आवरते घेण्यासाठी विविध हिंदुत्ववादी संघटना प्रतिआंदोलन करीत आहेत. अशाच एका घटनेत आंदोलकांवर हल्ला झाला असून त्यात पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत.

Advertisement

दैनिक हरीभूमी यांनी याबाबत न्यूज प्रसिद्ध केली आहे. त्यात म्हटले आहे की, शेतकरी आंदोलनात पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे. शुक्रवारी सिंधू सीमेवर गदारोळ झाला. त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फोडले आणि लाठीचार्ज केला.

Advertisement

दुपारी 1 च्या सुमारास नरेलाहून आलेल्या काही लोकांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांनी आंदोलन बंद करावे, अशी त्यांची मागणी होती. दरम्यान, प्रतिआंदोलक आणि शेतकरी यांच्यात हिंसक गदारोळ उडाला. दोन्ही बाजूने जोरदार दगडफेक झाली. या चकमकीत पाच पोलिस जखमी झाले. अलिपूर पोलिस ठाण्याचे एसएचओ प्रदीप पालीवाल यांनाही तलवार लागली. एसएचओवर हल्ला करणार्‍या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, तो व्यक्ती कोणत्या गटाचा हे जाहीर केलेले नाही.

Advertisement

दरम्यान, जखमी अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निषेधासाठी आलेल्या लोकांनी सांगितले की, शेतकरी आंदोलनामुळे लोकांचे व्यवसाय ठप्प पडत आहेत. स्थानिक रहिवासी असल्याचा दावा करणारे लोक शेतकर्‍यांच्या तंबूत पोहोचले आणि त्यांना लागणार्‍या वस्तू तोडल्या.

Advertisement

किसान मजदूर संघर्ष समितीचे नेते सतनामसिंग पन्नू यांनी केंद्र सरकारवर आंदोलनात गोंधळ निर्माण करण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, ‘केंद्र सरकार आरएसएसच्या लोकांना आंदोलनाच्या ठिकाणी पाठवत आहे. पण, कृषी कायदे परत येईपर्यंत शेतकरी परत जाणार नाहीत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे 

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply