Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. मृत प्रियजनांशीही चॅटिंग करायला मिळणार; पहा मायक्रोसॉफ्ट ChatBot काय घेऊन येतेय ते

आपले दिवंगत एकदा सोडून गेल्यावर त्यांच्याशी संवाद साधने कदापीही शक्य नाही. असेच सध्या आपल्याला सर्वांना वाटते. मात्र, लवकरच आपल्याला सोडून गेलेल्या प्रियजनांशी संवाद साधण्याची सोय अवघ्या जगाला उपलब्ध होणार आहे. त्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीने पेटंट रजिस्टर केले आहे.

Advertisement

 अमेरिकेतील प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘ब्लॅक मिरर’मध्ये मुख्य भूमिकेतील मुलगी तिच्या मृत प्रियकरासोबत त्याच्या सोशल मीडिया अकाउंटमधून घेतलेल्या माहितीच्या आधारे बोलत असते. त्याच काल्पनिक कादंबरीच्या आधाराने कल्पना सुचल्यावर आता त्यावर मायक्रोसाॅफ्टच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांनी कामही सुरू केले आहे.

Advertisement

या प्रकल्पाचे महाव्यवस्थापक टिम ओब्रायन यांनी सांगितले की, जे आता जगात नाहीत, मृत पावले आहेत, त्यांच्यासोबत बोलल्याचा भास करून देणारे चॅटबोट मायक्रोसॉफ्टने तयार केले आहे.

Advertisement

दिवंगत व्यक्तीसोबत तुम्हाला बोलायचे असल्यास त्याच्याशी संबंधित सर्व डेटा (छायाचित्र, सोशल मीडिया पोस्ट, मेसेजेस, व्हॉइस डेटा किंवा त्यांनी लिहिलेली पत्रे) दिल्यावर चॅटबोट त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वीकारेल आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्या पद्धतीने उत्तर देईल. चॅटबोटची भाषाशैली, आवाजातील चढ-उतार आणि संवेदनाही आपल्या दिवंगत व्यक्तीच्याच असतील. दिवंगत व्यक्तींचे २-डी आणि ३-डी इमेजसह फेशियल रिकग्निशन अल्गोरिदमचा वापर करून जिवंत चित्र तयार करण्याचीही सोय याद्वारे मिळणार असल्याचे पेटंट फाईलमध्ये म्हटले आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement
Advertisement

Leave a Reply