अहमदनगर :
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सध्या माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले हेच केंद्रबिंदू बनले आहेत. भाजपच्या समितीमध्ये असलेले कर्डिले यांनी थेट संगमनेर येथील बैठकीत जाऊन अनेकांना चकवा दिला आहे. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे यात कितपत लक्ष घालतात यावर भाजपच्या विखे गटाची मोर्चेबांधणीची दिशा ठरणार आहे.
कर्डिले व विखे यांच्यासह माजी मंत्री राम शिंदे यांच्या समितीच्या मार्गदर्शनाखी जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीस सामोरे जाण्याचे नियोजन भाजपने केले होते. मुंबईत फडणवीस यांच्या निर्देशाने हे सुरळीत चालले होते. मात्र, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरच्या बैठकीत कर्डिले यांना निमंत्रित केले. त्यात कर्डिलेही सहभागी झाले आणि मग भाजपच्या शिडातील हवा निघण्यास सुरुवात झाली.
कर्डिले हे नगर दक्षिण जिल्ह्यातील प्रभावी नेते आहेत. भले त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालेला असेल. मात्र, नगर तालुक्याला जोडणाऱ्या पारनेर, श्रीगोंदा, राहुरी, पाथर्डी तालुक्यांसह नगर शहरात त्यांचा प्रभाव आहे. अशावेळी त्यांना बरोबर घेणे ही थोरात आणि विखे या दोन्ही गटांची अपरिहार्यता आहे.
मात्र, कर्डिले यांनी दोन्ही बाजूंशी संवाद ठेवत आपल्यावरील प्रकाशझोत अजिबात हटू दिलेला नाही. नगर तालुक्यातही त्यांनी आपली पकड मजबूत असल्याचे उमेदवारी अर्ज भरताना स्पष्ट दाखवून दिले आहे. अशावेळी आता कर्डिले भाजपच्या विखेंच्या गटात असणार की महाविकास आघाडीत येऊन थोरात व ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे हात बळकट करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक