Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : अजितदादांच्या आजच्या बैठकीत ठरणार आघाडीची दिशा; नाहीतर..

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शह देण्यासाठी महाविकास आघाडी सरसावली आहे. मात्र, अजूनही आघाडीत नेमके कोण हाच पेच आहे. कारण, भाजपच्या अनेकांनी आघाडीशी घरोबा केला आहे. त्यामुळे आजच्या पुण्यातील बैठकीत खऱ्या अर्थाने पुढील दिशा ठरण्याची चिन्हे आहेत.

Advertisement

आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीची आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्यात आघाडीत भाजपच्या माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना घेण्याच्या मुद्द्यासह अनेकजण इच्छुक असलेल्या पारनेर आणि इतर सोसायटी मतदारसंघातील उमेदवारीबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे.

Advertisement

एकूणच अजितदादा कोणते निर्देश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. भाजपला समवेत घेऊन लढल्यास शिवसेनेची नाराजी होणार आहे. त्यामुळेच आजच्या बैठकीत काय होणार, की पुन्हा एकदा बैठक पे बैठक होत राहणार हे आज रात्रीच स्पष्ट होणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply