Take a fresh look at your lifestyle.

इतर देशांसाठी ‘या’ 6 गोष्टी आहेत सामान्य; मात्र भारतात ‘त्या’ गोष्टी करायचा कोणी विचारही करू शकत नाही

  1. तुर्कीमध्ये एक मिठाई आहे जी चिकनपासून बनवली जाते :-  चिकनपासून मिठाई बनवण्याचा कोणीही विचार करणार नाही. आणि जारी कोणी असा पदार्थ केला, तरीही आपल्याकडे तो खाल्ला जाणार नाही. कारण आपल्याकडे चिकन हे मस्तपैकी तिखट करून खाल्ले जाते. तुडकीमध्ये Tavuk Göğsü नावाची पुडिंग खाल्ली जाते जी चिकन, दूध, तांदूळ, साखर आणि दालचिनीपासून बनविला जाते.
  2. ब्राझीलमधील स्त्रिया शरीरावरचे केस काढून टाकण्याऐवजी पांढरे करणे पसंत करतात :- जगभरातील महिला आपल्या शरीरावरील केस काढून टाकतात. मात्र ब्राझीलच्या स्त्रिया पांढर्‍या केसांना सौंदर्याचे प्रतीक मानतात. म्हणून त्या शरीरावरील केस काढण्याऐवजी पांढरे करतात.
  3. कोलंबियामध्ये आपल्याला हॉट चॉकलेटमध्ये चक्क गोड पनीरचे तुकडे टाकून दिले जातात:- कोलंबियामधील लोकांना चॉकलेटची विशेष आवड आहे. येथे हॉट चॉकलेटमध्ये गोड पनीरचे तुकडे टाकून पिणे सामान्य आहे. पर्यटकांच्या मते ते खूपच स्वादिष्ट लागते.
  4. फ्रान्समध्ये दूध फ्रिजमध्ये ठेवले जात नाही :- बहुतांश फ्रेंच सुपरमार्केटमध्ये फ्रीजमध्ये दूध ठेवले जात नाही. कारण तिथे सर्वत्र अल्ट्रा-पास्चराइज्ड दुधाची विक्री केली जाते, ज्यास फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. या कारणास्तव फ्रान्समध्ये दूध फ्रीजमध्ये ठेवणे सामान्य आहे.
  5. दक्षिण कोरियामध्ये लाल शाईचा वापर अतिशय कमी ठिकाणी केला जातो. कारण तिथे ज्याचा मृत्यू झाला आहे, अशाच व्यक्तीचे नाव लाल शाईने लिहिले जाते. यामुळेच पर्यटकही तिथे लाल पेन वापरण्यापूर्वी विचार करतात.
  6. जपानमधील रस्त्यांना कुठेही नावे दिली जात नाहीत. नावाऐवजी तिथे ब्लॉक आणि विभाग क्रमांक वापरले जातात. ही पद्धत कदाचित आपल्याला गोंधळात टाकणारी वाटेल, परंतु आपल्याकडे नकाशा असल्यास काही सेकंदात आपल्याला आपले पोहोचायचे ठिकाण सापडेल. तथापि काही मुख्य रस्ते आणि राजमार्ग हे अपवाद आहेत.

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply