Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ निर्णयाच्या विरोधात 30 हजार महिला रस्त्यांवर; पहा कुठे घडलीय ही घटना

लोकशाहीमध्ये सर्वांना आपले हक्क मागण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. हाच महत्वाचा हक्क बजावत युरोपातील पोलंड या देशात सुमारे 30 हजार महिला थेट रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांची अवघ्या जगणे दखल घेतली आहे.

Advertisement

युरोपीय देश पोलंडमध्ये आधीच कडक गर्भपात कायद्याला काेर्टाने आणखी कठोरपणे लागू करण्याठीची कार्यवाही होत आहे. त्यासाठी त्या देशातील राजकीय नेतेही सक्रीय आहेत. त्याच निर्णयाच्या विरोधात महिलांनी सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे.

Advertisement

महिला आंदोलकांनी गुरुवारी न्यायालयाच्या बाहेर आणि सत्ताधारी पक्षनेत्यांच्या घराबाहेर निदर्शने केली. तसेच गर्भपाताला संवैधानिक रूप देण्याची मागणी केली. गर्भ आमचा, त्यावर हक्कही आमचा असला पाहिजे. मग कोर्ट किंवा राजकीय निर्णयाचा दबाव का असावा, आम्हाला या कायद्यापासून मुक्तता देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.

Advertisement

पोलंडमधील सध्याचा गर्भपात कायदा १९९३ मध्ये पारित झाला होता. त्यानुसार मातेच्या जीविताला धोका असेल तेव्हाच गर्भपात करण्याची परवानगी आहे. त्यातही १२ व्या आठवड्यांपर्यंतची मुदत आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांना ८ वर्षांची कैद होऊ शकते. यात आणखी जास्त कडक नियम घातले जाणार असल्याच्या निषेधार्थ महिलांनी हे आंदोलन सुरू केले आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply