सध्या देशभरात शेतकरी आंदोलक आणि दिल्ली पोलीस यांच्या बाजूने विरोधी किंवा समर्थनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनास हिंसक स्वरूप प्राप्त झाल्याने अशा पद्धतीने खोट्या बातम्यांसाठी जुने पुरावे वापरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. एका जखमी शेतकऱ्याच्या फोटोचीही दुर्दैवाने तीच व्यथा आहे.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये काळेनिळे व्रण उठलेल्या ‘त्या’ शीख समाजाच्या व्यक्तीचे फोटो शेअर केले होते. नंतर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. मात्र, अनेकांनी शेतकरी आंदोलकांना बेदम मारहाण होत असल्याचे जोडून असे फोटो शेअर केले होते.
मुळात मागील 4-5 दिवसात इतके फोटो आणि व्हिडिओ शेअर झालेले आहेत की, कोणता खोटा आणि कोणता खरा याचाच संभ्रम निर्माण झालेला आहे. भाजप, काँग्रेस यांच्यासह अनेकांनी असे बोगस फोटो आणि व्हिडिओ शेअर करून मनाची शांती करून घेतली आहे.
मात्र, पोलिसांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शीख समाजाच्या व्यक्तीचा शेअर होणारा फोटो ताजा नसून खूप जुना आहे. दिल्ली पोलिसांनी जून 2019 मध्ये झोडपट्टी केलेल्या एका व्यक्तीचा तो फोटो आहे. पोलिसांनी मारल्याच्या त्या बातमीला त्यावेळी दैनिक भास्कर आणि आज तक यांनी प्रसिद्धी दिली होती.
कितनी बेहरम है दिल्ली पुलिस, मामूली बात पर ऐसी पिटाई – YouTube
मात्र, तोच जुना फोटो पताजा असल्याचे दाखवून जोरात शेअर केला जात आहे. एकूणच खोट्या बातम्यांचा रतीब घालण्यात भारतीय कुठेही कमी नसल्याचे यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे. यात कोणताही राजकीय पक्ष मागे नाही. यावर ALT न्यूज यांनी वास्तव स्पष्ट करणारे फिचर प्रसिद्ध केले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!