मुंबई :
राजकरणात व्यक्तींच्या आणि पक्षाच्या भूमिका बदलत असतात. जिथे संधी सापडेल तिथे राजकीय व्यक्ती किंवा पुढारी संधीचा फायदा घेत असतात. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून शिवसेनेची भूमिका दिवसेंदिवस सेक्युलर होत चालली असल्याची ओरड हिंदुत्ववादी करत आहेत. आणि हिंदुत्ववादाची हीच पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न मनसेने करण्याचे ठरविले आहे, असे दिसत आहे.
आधी मराठीच्या मुद्द्यावर मनसेने राजकारण केले मात्र त्याला बंधने आली. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक अशा काही मोजक्या ठिकाणीच या मुद्द्याला गांभीर्याने घेतले गेले. नंतर मनसेला कोणती भूमिका घेऊन पुढे जायचे, हे आजवरही लक्षात आलेले नाही, असे वरवर दिसते. आत अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्या दौरा करणार आहेत. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान ते अयोध्येला जाणार असून श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत.
एकूणच मनसेचा मूड बघता मनसे हिंदुत्वाच्या वाटेने जात आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत. अशातच भाजपच्या एका बड्या नेत्याने राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे या निवडणुकीसाठी एकत्र येऊ शकते.
दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल करण्याचे संकेत दिल्यानंतर राज यांचा अयोध्या दौरा आणि भाजप नेत्याची भेट, हे सर्व राज यांची दिशा ठरवणारे आहे. त्यांचा ओघ कोणत्या दिशेने आहे, हे दिसून येत असल्याने मनसे समर्थक आता त्यांच्या पाठीशी राहणार का? सातत्याने मोदींवर टीका करूनही त्यांच्या पक्षाशी मिळतीजुळती भूमिका किंवा त्यांच्या पक्षाशी युती केल्यास किती कार्यकर्त्यांना रुचेल, हासुद्धा प्रश्न आहेच.
संपादन : विनोदकुमार सूर्यवंशी
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अजित पवारांनी दिली वीजबिल वसुलीस स्थगिती; पहा कोणापुढे वरमले ठाकरे सरकार
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा