मुकेश अंबानींच्या ताफ्यात आली नवीन कार; बॉम्ब टाकला तरी पडणार नाही फरक; वाचा ‘त्या’ गाडीचे दमदार फीचर्स
रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून विविध कारणांनी माध्यमात चर्चेत असतात. सध्या मात्र ते आपल्या नवीन बुलेट प्रूफ मर्सिडीज कारमुळे चर्चेत आहेत. मुकेश अंबानी हे जगातील 10 सर्वात श्रीमंत लोकांपैकी एक आहे, त्यामुळे त्यांना धोका असणे स्वाभाविक आहे आणि हेच लक्षात घेऊन त्यांना सरकारकडून झेड सुरक्षा मिळालेली आहे. त्यांच्या ताफ्यात याआधी सुरक्षेसाठी BMW 760Li High Security आणि Mercedes S Class Guard अशा गाड्या आहेत. आता या ताफ्यात एका बुलेट प्रूफ मर्सिडीज एस 600 (Mercedes S600 Guard) या गाडीचा समावेश झाला आहे.
मुकेश अंबानी यांनी अलीकडेच एक Mercedes S600 Guard बुलेट प्रूफ कार खरेदी केली आहे. कंपनीने या कस्टमाइज़ कारची डिलीवरीसुद्धा केली आहे. लवकरच त्याचा समावेश अंबानींच्या ताफ्यात करण्यात येईल. जरी कारच्या किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती नसली, तरी ऑटो क्षेत्रातील तज्ञांच्या माहितीनुसार या गाडीची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे.
ही कार अत्यंत फीचर्स असणारी आहे. या गाडीवर अगदी बॉम्ब फेकला तरीही या गाडीला काहीही फरक पडणार नाही. या लक्झरी कारमध्ये बर्याच उत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. यात पॉली कार्बोनेट कोटेड विंडो आहेत. कारचा मुख्य भाग विशेष प्रकारच्या मजबूत स्टीलपासून बनविला गेला आहे.
मुकेश अंबानी यांची ही लक्झरी कार साध्या मॉडेलसारखीच दिसत आहे, परंतु चंदेरी रंग असलेली ही गाडी Mercedes-Maybach S600 सिडान वर आधारित आहे. या गाडीत VR 10 ही सुरक्षा टेक्निक वापरली गेली आहे. म्हणूनच या गाडीचे मूल्य सुमारे 10 कोटी रुपये सांगितले जात आहे. कंपनीने या गाडीत 6.0 लीटर ची क्षमता असलेले V12 बाई टर्बोचार्ज पेट्रोल इंजन वापरले आहे. हे इंजिन 523 BHP ची दमदार पावर आणि 850 NM टॉर्क जनरेट करते. या कारमध्ये 7 स्पीड ऑटोमेटिक ट्रांसमिशन गियरबॉक्सचा समावेश करण्यात आला आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!