Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी : ‘या’ तारखेपासून सर्वांना करता येणार लोकल ट्रेनचा प्रवास

मुंबई :

Advertisement

कोरोनाकाळापासून शाळा, महाविद्यालये, सरकारी आणि खाजगी कार्यालये तसेच खाजगी आणि सरकारी वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या होत्या. जसजसा कोरोनाच प्रादुर्भाव कमी होऊ लागला तसतसा सर्व ऑफिस आणि इतर सेवा हळूहळू सुरू करण्यात आल्या. वाहतूक सेवाही सुरू झाल्या होत्या मात्र मुंबईमध्ये अनेक लोकल ट्रेन बंद होत्या. तसेच प्रवास करण्यावरही बंधणे होती. मात्र आता सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ही घोषणा केली. गेल्या जवळपास वर्षभरापासून लाखो मुंबईकरांचे डोळे लागलेली उपनगरीय लोकल ट्रेन अखेर १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी सुरू होणार आहे. गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement

यावेळेत करत येईल प्रवास :-

Advertisement

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

Advertisement

या वेळेत प्रवास करण्यास बंदी :-

Advertisement

म्हणजेच सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply