Take a fresh look at your lifestyle.

घरगुती बियाणेही उत्तम; सोयाबीनबाबत कृषी संशोधकांनी केले ‘हे’ आवाहन

अमरावती :

Advertisement

प्रतिवर्षी खरीप हंगामासाठी लागणाऱ्या सोयाबीन बियाण्यांची गरज पूर्ण होत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होते. मात्र, शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे घरच्या घरी जतन करून आपल्या गावाला लागणाऱ्या बियाण्याची गरज गावनिहाय भागवावी, असे आवाहन कृषी संशोधकांनी केले आहे.

Advertisement

खिरगव्हाण येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य) अंतर्गत हरभरा पिकावर कार्यशाळा व शास्त्रज्ञ भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. जितेंद्र दुर्गे यांनी मार्गदर्शन केले.

Advertisement

 ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणे पेरणी योग्य आहे, त्यांच्याकडून बियाणे खरेदी करावे. दर महिन्याला सोयाबीनची उगवण क्षमता चाचणी कृषी सहाय्यक यांच्या मार्गदर्शनाखाली तपासून घ्यावी. जेणेकरून आपण ठेवलेल्या बियाण्याची उगवण क्षमता किती टक्के आहे तसेच आपणास किती किलो बियाणे लागेल याचा अंदाज घेता येईल, असे मार्गदर्शन केले.
सध्याच्या बदलत्या वातावरणात आणि संकरीत बियाण्यांचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी वे‌ळीच सावध होणे गरजेचे आहे. कारण घरचे बियाणे उपयुक्त आणि शेतीत हमखास उत्पादनाची हमी देणार आहे. सोयाबीन बियाण्यांची टंचाई पाहता, त्यावर येणाऱ्या रोग, किडीचा प्रादुर्भाव पाहता शेतकऱ्यांनी पीक बदल करून तूर व उडीद, तूर व मुंग, सलग तूर, ज्वारी व तूर अशी आंतरपिके घेण्याचे आवाहन या प्रसंगी तज्ज्ञांनी उपस्थित केले.

Advertisement

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळ कृषी अधिकारी किरण मुळे यांनी केले. सूत्रसंचालन कृषी सहाय्यक संजय येवले, तर आभार प्रदर्शन भागवत सोमटकर यांनी केले. या वेळी पोलिस पाटील राजेश घोगरे, सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply