Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर आघाडीत बिघाडी शक्य; पहा निवडणुकीवर काय होऊ शकतात परिणाम

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना शह देण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते सरसावले आहेत. प्रतिवर्षी ज्या पद्धतीने विखे विरुध्द इतर सगळे असेच या निवडणुकीला स्वरूप आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांना महाविकास आघाडीत स्थान दिल्यास उमेदवारीचा मुद्दा आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांच्या विरोधास आघाडीला सामोरे जावे लागणार आहे. नगर जिल्हा पातळीवर हा पेच निर्माण झालेला आहे.

Advertisement

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देऊनही जिल्ह्यात विखे व माजी मंत्री राम शिंदे यांच्यासमवेत ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले यांच्या एकत्रित बैठका सुरू झालेल्या नाहीत. उलट संगमनेर येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बैठकीचे निमंत्रण स्वीकारून कर्डिले तिकडे हजर राहिले होते. तसेच नंतर त्यांनी विखे स्टाईलने राजकारण चालू असल्याचा टोलाही लगावला होता.

Advertisement

मात्र, कर्डिले यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांशी असलेली जवळीक शिवसेनेच्या व राष्ट्रवादीच्या अनेकांना खटकणारी आहे. मंत्री प्राजक्त तनपुरे आणि कर्डिले यांच्यात राहुरीमध्ये विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा लढत होईल असेच चित्र आहे. त्यामुळे तनपुरे गट यावर अजूनही अर्थपूर्ण शांत आहे. तर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी नगर तालुक्यात कर्डिले यांच्या विरोधात उमेदवार देऊन जिंकण्यासाठीचे प्रयत्न सुरूही केले आहेत. कॉंग्रेसच्या एका गटाचाही कर्डिले यांना विरोध आहे.

Advertisement

एकूणच कर्डिले यांची भाजप व विखे गट सोडून थेट महाविकास आघाडीशी असलेली जवळीक अनेकांना खटकणारी आहे. कर्डिले यांचे नगर दक्षिणेत प्राबल्य आहे. अनेक गावोगावी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यामुळे ते विखे व थोरात अशा दोन्ही गटाला हवेसे आहेत. मात्र, महाविकास आघाडीत त्यांना बरोबर न घेण्याची मागणी करणारे खूप आहेत. त्यामुळे जर कर्डिले महाविकास आघाडीत राहिले तर या आघाडीत फुट होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे थोरात, ज्येष्ठ नेते शरद पवार अन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यातून कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply