Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ झेडपी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; पहा काय आहेत मागण्या

अहमदनगर :

Advertisement

सरकारकडून आश्वासन देऊनही प्रलंबित मागण्यांची सोडवणूक होत नसल्याने महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेने तीन दिवसीय आंदोलन सुरू आहे. कर्मचारी संघटनेने निदर्शने केली असून आज दिवसभर (शुक्रवारी) कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहेत.
राज्यभरातील जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये परिचर कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. संघटनेने जिल्हा परिषदेच्या आवारात निदर्शने करून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनात जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक काळापहाड, जि. प. राज्य कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष सुभाष कराळे, जि. प. कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष विकास साळुंके, सागर आगरकर, सुरेश भोजणे, नीलेश गाडेकर, चंद्रकांत पाचारणे, श्रीकांत ढगे, ऋषिकेश बनकर, श्यामसुंदर शेळके, लहानू उमाप, मिरा पतंगे आदी सहभागी झाले होते.

Advertisement

शासनाने वर्ग ४ ची पदे निरसित करू नये, चतुर्थ श्रेणीची २५ टक्के पदे निरसित करण्याचा १४ जानेवारी २०१६ चा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, चतुर्थ श्रेणी सेवांचे व कर्मचाऱ्यांचे खासगीकरण, कंत्राटीकरण करू नये, अनुकंपा तत्त्वावरील भरती विनाअट तत्काळ करावी, वेतन त्रुटीसंदर्भातील खंड २ च्या अहवालाची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply