‘या’ सुप्रसिद्ध कंपनीचा सोन्याने मढवलेला फोन तयार; विकत घेण्यासाठी मोजावे लागणार ‘एवढे’ पैसे
दिल्ली :
लॉकडाउनच्या काळात सोन्याचा मास्क घातलेली लोकं चर्चेत होती. लोक हौशी असतात आणि हौसेला मोल नसते. लाखो रुपये घालून सोन्याचा मास्क बनवणारे अनेक बहाद्दर आपल्या दिसतील. तसेच आजकाल महागडा स्मार्टफोन हातात दिसावा यासाठी अनेक जन लाखो रुपये मोजतात. आता मोबाईल क्षेत्रातील आघाडीची कंपनी अॅपलने एक सोन्याने मढवलेला फोन तयार केला आहे. हा अॅपलचा लेटेस्ट iPhone 12 प्रो काही महिन्यांनंतर लाँच होणार आहे.
अॅपलचा हा सोनेरी फोन खरेदी करण्यासाठी मात्र मजबूत किंमत मोजावी लागणार आहे. विशेष म्हणजे हा आयफोन १२ प्रो साठी तब्बल १७ लाखांहून अधिक किंमत मोजण्याची तयारी अनेकांनी दाखवली आहे. लग्झरी फोन बनवणारी कंपनी ब्रँड Caviar कडून याचा फोटो शेयर करण्यात आला आहे.
ही आहेत फोनची वैशिष्ट्य :-
१) iPhone 12 Pro ला १८ कॅरेटच्या सोन्याने मढवले आहे.
२) बॅक पॅनेलला जबरदस्त पॅटर्न आहे.
३) नाव iPhone 12 Pro Victory Pure Gold असून फोनवर फ्लोरल डिझाईन शिवाय ०.४८ कॅरेटचे हीरे लावण्यात आले आहेत.
४) गोल्ड फिनिश आणि लेदरची जबरदस्त पॅकेजिंग मध्ये येणाऱ्या या फोनमध्ये सोन्याशिवाय कार्बन आणि टायटेनियम व्हर्जन मध्ये सुद्धा खरेदी केले जावू शकते.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!