Take a fresh look at your lifestyle.

ब्रेकिंग : अभिनेता शर्मन जोशीचे वडील, दिग्दर्शक अरविंद जोशी यांचे निधन

मुंबई :

Advertisement

बॉलिवूड अभिनेता शरमन जोशी यांचे वडील अरविंद जोशी यांचे नुकतेच निधन झाले आहे. कला क्षेत्रात त्यांची ओळख गुजराती थिएटर अभिनेता आणि दिग्दर्शक अशी होती. त्यांचे आज म्हणजेच 29 जानेवारी रोजी निधन झाले. डीएनएच्या वृत्तानुसार, ‘अरविंद यांचे मुंबई नानावटी रुग्णालयात निधन झाले आहे’ अशी माहिती ड्रेड एनालसिस्ट कोमल नाहटा यांनी दिली आहे. तथापि,मृत्यू नेमका कशामुळे झाला याविषयी कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

Advertisement

आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. मुंबईच्या जुहूस्थित नानावटी रूग्णालयात पहाटे 3 च्या सुमारास त्यांनी अंतिम श्वास घेतला. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा शर्मन जोशी व मुलगी मानसी जोशी शिवाय बराच मोठा आप्त परिवार आहे. मानसी ही सुद्धा टेलिव्हिजन विश्वातील मोठे नाव आहे. ती अभिनेता रोहित रॉयची पत्नी आहे.

Advertisement

चित्रपट अभिनेता परेश रावल यांनीही अरविंद जोशी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून ‘हे भारतीय नाट्यगृहाचे मोठे नुकसान असल्याचे’ त्यांनी म्हटले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर केलेल्या ट्विटमध्ये परेश यांनी लिहिले की, त्यांच्या जाण्याने भारतीय रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही प्रख्यात अभिनेते श्री. अरविंद जोशी यांना मोठ्या वेदनांनी निरोप देतो. एक अष्टपैलू अभिनेता, एक कर्तृत्ववान थीस्पियन असे शब्द त्यांच्या अभिनयाबद्दल विचार करतांना माझ्या मनात येतात.शर्मन जोशी आणि त्यांच्या परिवाराबद्दल माझी पूर्ण संवेदना. ओम शांती.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply