Take a fresh look at your lifestyle.

मारुती सुझूकीच्या ‘त्या’ सर्वाधिक लोकप्रिय कारचा नवा रेकॉर्ड; 15 वर्षात केलेय ‘ते’ काम

दिल्ली :

Advertisement

जास्त मायलेज, कमी मेंटेनन्स आणि कमी पैशात मिळणार्‍या कार म्हणजे मारुती सुझूकीच्या. आजही सामान्य भारतीय माणसांच्या मनावर गारुड घालणारी कंपनी म्हणून मारुती सुझूकीचं नाव तोंडी येतं. आधी मारुती 800 या गाडीने सर्वाधिक खपाचा रेकॉर्ड केला होता. काही काळाने मारुती अल्टोने हा रेकॉर्ड मोडला. मधल्या काळात 2020 मध्ये देशातील सर्वात जास्त विकली जाणारी कारचा रेकॉर्ड स्विफ्टच्या नावे झाल्याची माहिती समोर आली होती.

Advertisement

आता नव्या रेकॉर्डनुसार, Maruti Suzuki India ने अधिकृतपणे ही घोषणा केली आहे की, कंपनीची प्रसिद्ध हॅचबॅक कार स्विफ्टने २३ लाख युनिट्सची विक्री केली आहे. मारुती सुझुकी स्विफ्ट भारतातील ऑटोमोबाइल बाजारात सर्वात यशस्वी कार पैकी एक ठरली असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.

Advertisement

कंपनीनेही आजवर कारमध्ये चांगले बदल करून लोकांसमोर आणल्याने या कारची मार्केटमधील हवा अजूनच वाढली. आता भारतीयांच्या पसंतीस उतरलेली स्विफ्ट शानदार लुकसह अजून स्पोर्टी होत आपल्या भेटीला येणार आहे. या नव्या स्विफ्टच्या एडिशन या लिमिटेड असतील.

Advertisement

कंपनी या हॅचबॅकचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करणार आहे. नुकतीच याच्या टेस्टिंग दरम्यान झलक पाहायला मिळाली होती. 2021 Maruti Swift Facelift मध्ये नवीन ग्रील, ड्यूल टोन एक्सटीरियर आणि नवीन इन्फोटेनमेंट सिस्टम सह अनेक जबरदस्त आणि लेटेस्ट फीचर्स पाहायला मिळतील. यानंतर ही हॅचबॅक आणखी खास होणार आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply