Take a fresh look at your lifestyle.

पश्चिम बंगाल : काँग्रेसने घेतली पडती बाजू; पहा किती जागांवर लढणार हा पक्ष

कोलकाता :

Advertisement

पश्चिम बंगालमध्ये यंदा सर्व ठिकाणी तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. कारण, भाजप आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेस यांच्यासह काँग्रेस व डावे पक्ष यांची आघाडीही रिंगणात उतरणा आहे.

Advertisement

त्यासाठी काँग्रेस-डावे पक्ष यांच्यात विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावर करार झाला आहे. १९३ जागांवर सहमती झाली असून त्यात काँग्रेस ९२ व डावे पक्ष १०१ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

Advertisement

डाव्या पक्षांनी २०१६ मध्ये ७७ जागा जिंकल्या होत्या. त्या सर्व जागा डाव्यांसाठी साेडण्यात आलेल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चाैधरी व डाव्या आघाडीचे प्रमुख बिमान बाेस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिली.

Advertisement

उर्वरित १०१ जागांवर मात्र निर्णय झालेला नाही. तो लवकरच घेतला जाईल, असे दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे. राज्यात एकूण २९४ विधानसभा जागा आहेत. एप्रिल-मेमध्ये निवडणूक हाेण्याची शक्यता आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply