Take a fresh look at your lifestyle.

वाईट बातमी : वाढता वाढता वाढे भ्रष्टाचाराचे पाढे; पहा भारतासह पाक-चीनची काय आहे परिस्थिती

भारतात असा कोणताही एक राज्य किंवा सरकारचा विभाग नसेल जिथे भ्रष्टाचार होत नाही. तरीही देशातील जनता समाधानाने हा भ्रष्टाचार पचवत आहे. नव्हे काहीजण त्यात सहभागी होत आहेत. परिणामी दिवसेंदिवस देशातील भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी तो वाढून शिष्टाचार बनत आहे.

Advertisement

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल संथेने करप्शन परसेप्शन इंडेक्स (सीपीआय) जाहीर केला आहे. त्यात म्हटले आहे की, भारतातील भ्रष्टाचारात कमी होण्याऐवजी काहीअंशी वाढ झाली आहे. यादीत भारताला १०० पैकी फ़क़्त ४० गुण देण्यात आले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत भारताची काही अंकांनी घसरण झाली.

Advertisement

भारताचा निर्देशांक ६ अंकांनी घसरून ८० वरून ८६ झाला आहे. जगभरातील १८० देशांची क्रमवारी तयार करण्यात आली असून त्यात चीनला ७८ वे स्थान, तर पाकिस्तान व बांगलादेश यांनी अनुक्रमे १२४ आणि १४६ क्रमांक पटकावला आहे.

Advertisement

क्रमवारीत न्यूझीलंडला पहिले स्थान मिळाले आहे. या देशात भ्रष्टाचार कमी प्रमाणात आहे. ब्रिक्स देशांत दक्षिण आफ्रिका ६९ व्या, ब्राझील ९४ व्या, रशिया १२९ व्या तर चीन ७८ व्या क्रमांकावर आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply