Take a fresh look at your lifestyle.

ऑटो क्षेत्रात ‘गेमचेंजर’ ठरलेली ‘ती’ कार जबरदस्त लुकसह भारतात लॉंच; वाचा तिच्या तगड्या फीचर्सविषयी

दिल्ली :

Advertisement

थोड्याच कलावधीत लोकप्रिय झालेली रेनो कंपनीची गेमचेंजर किगर कार नुकतीच भारतात लॉंच झाली आहे. रेनॉल्ट किगर कॉम्पॅक्ट एसयूव्ही ही संकल्पना नोव्हेंबर 2020 मध्ये प्रथम जगासमोर आणली गेली. किगर ही कंपनीची B-सुव मॉडेल आहे. हे फ्रान्स आणि भारताच्या कॉर्पोरेट डिझाईन टिमने संयुक्तपणे विकसित केले आहे. रेनॉल्ट किजर या ग्रुपची तिसरी ग्लोबल कार असेल, जी पहिल्यांदा भारतात लॉन्च होईल. त्यानंतर इतर देशांमध्ये लॉन्च होईल. रेनॉल्ट किगर 6 रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Advertisement

या कारची टक्कर भारतीय बाजारात Maruti Suzuki Vitara Brezza, Toyota Urban Cruiser, Mahindra XUV 300, Tata Nexon, Kia Sonet, Hyundai Venue आणि Ford EcoSport या गाड्यांशी होईल. डस्टर, क्विड आणि ट्रायबरप्रमाणे रेनो काइगर देखील या सेगमेंटमधील गतिमानतेची व्याख्या बदलणार आहे. ‘रेनो ही खरोखरच गेम चेंजर असल्याचा हा एक ठोस पुरावाच आहे’, असे सेल्स आणि ऑपरेशन्स रेनो ब्रँडचे एसव्हीपी फब्रीस कँबोलीव्ह यांनी सांगितले. रेनोने भारतातील आपली घोडदौड सुरूच ठेवली आहे. 

Advertisement

 रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक वेंकटराम ममिल्लापल्ले यांनी सांगितले की, केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील जास्त लोकांना एसयुव्हीचा पर्याय खुला करून देणाऱ्या डस्टरप्रमाणेच रेनो काइगर एसयुव्ही ही देखील पुन्हा एकदा अगदी नव्या ग्राहकांना भुरळ घालेल.या नव्या गेम-चेंजरमुळे आमचा ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास आम्हाला आहे.

Advertisement
Mr. Venkatram Mamillapalle, Country CEO & Managing Director, Renault India Operations unveiling the Renault KIGER at the Global Reveal in New Delhi.

असे आहेत फीचर्स :-

Advertisement

एक्सटीरियर फीचर्स :- 205 mm ग्राउंड क्लियरेंस, क्रोम फ्रंट ग्रिल, LED DRLs, प्योर विजन LED हैडलैंप्स, स्किड प्लेट, C शेप सिग्नेचर एलईडी टेल लैंप्स, डायमंड कट अलॉय व्हील्स, स्पोर्टी रियर स्पोइलर

Advertisement

या कारला इको, नॉर्मल आणि स्पोर्टमध्ये चालवता येऊ शकते. या कारमध्ये मल्टीसेंस ड्राइव मोड फीचर असल्याने हे तिन्ही मोडमध्ये कार चालवणे शक्य आहे.   

Advertisement

वायरलेस स्मार्टफोन रेप्लिकेशन, वायरलेस स्मार्टफोन चा​र्जर, पीएम 2.5 क्लीन एयर फिल्टर, Apple CarPlay आणि Android Auto ला सपोर्ट करणारे 20.32 सेमी फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, फ्लोटिंग रूफटॉप, ARKAMYS 3डी साउंड सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, इंजन स्टार्ट/स्टॉप बटन म्हणजेच कीलेस एक्सेस, वॉइस रिकग्निशन, क्रूज कंट्रोल असेही फीचर्स आहेत.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply