Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात दिवसाच्या सुरूवातीला हलकीशी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर

दिल्ली :

Advertisement

गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सातत्याने मोठीन वाढ होत होती. पण शुक्रवारी सकाळीच सोन्याच्या किंमतीमध्ये हलकीशी घसरण पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या शेवटी सोन्याची झळाळी उतरली असल्याचे पहायला मिळाले आहे.

Advertisement

सोन्याच्या दरात आज दिवसाच्या सुरुवातीला १० रुपयांची घट नोंदविण्यात आली आहे. आजची घट फक्त १० रुपयांची जरी असली तरी काल सोन्याच्या दरात ३३० रुपयांची घट झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी दरात घट झाल्यानं सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४७,७९० इतका झाला आहे.

Advertisement

जगभरात होणार्‍या धांतुंच्या किमतीवर झालेला परिणाम देशांतर्गत पहायला मिळाला. तज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याचे दर अजूनही कमी होऊ शकतात. र मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम सोन्यासाठी ४७,७९० रुपये इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४८,७९० रुपये मोजावे लागतील. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात २२ कॅरेट सोन्यासाठी ४७,७९० हजार रुपये मोजावे लागतील. तर देशात बंगळुरू, केरळ आणि हैदराबादमध्ये सर्वात कमी ४५,६४० रुपये इतका दर नोंदविण्यात आला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार  

Advertisement

Advertisement

Leave a Reply