Take a fresh look at your lifestyle.

11 वर्षांपासून मुकेश अंबानींच्या पगारात झाली नाही अजिबातच वाढ; वाचा, किती आहे त्यांचा पगार आणि का झाली नाही वाढ

सोमवारी ऑफिसला जाताना अनेक लोकांचे तोंड असे असते की जसे ते एखाद्याची मयत करून आलेले आहेत. अनेक लोकांना सोमवारी ऑफिसला जायचा कंटाळा येतो. अनेकांना तर कायमच ऑफिसला जायचा कंटाळा येतो. अगदी चांगल्या जागी आणि चांगल्या पगारावर काम करणारे लोकसुद्धा ऑफिसचं नाव काढल्यास तोंड वेडवाकड करतात. प्रत्येकाला आठवड्यातून तीन सुटी मिळाल्या तरीही चौथ्या दिवशी ऑफिसला जाताना लोक तोंड लटकुन जातील. मात्र अशाही जगात एक माणूस असा आहे ज्याच्या पगारात गेल्या 11 वर्षांपासून वाढ झालेली नाही. मात्र तरीही तो माणूस रात्रंदिवस आपली कंपनी कशी मोठी होईल, याचा विचार करत असतो.

Advertisement

हा व्यक्ती दूसरा-तिसरा कोणी नसून भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आहेत. आज ते देशातील अनेक मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स या कंपनीचे संचालक आहेत. मुकेश अंबानी यांचा पगार 15 कोटी रुपये आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, PF आणि टॅक्स जाऊन हातात किती येत असतील. तर PF आणि टॅक्स सोडून त्यांच्या हातात कोट्यवधी रुपये येतात. कारण, ते रिलायन्स या कंपनीचे फक्त संचालक नसून मालकही आहेत.

Advertisement

आता तुम्हाला वाटत असेल की, अंबानी यांचा पगार वाढत का नाही? तर त्याचे सोपे उत्तर असे आहे की, मुकेश अंबानी हे संचालकाच्या खुर्चीत बसून पगारवाढीसाठी आपल्या मालकाला मेल करत असतील आणि पुन्हा ते स्वत:च उठून मालाकाच्या खुर्चीत जाऊन मेलला उत्तर देत असतील की, यावर्षी कंपनीची स्थिती वाईट आहे, पुढच्या वर्षी पाहू. … असो हा विनोदाचा भाग होता. स्वत: मालक असल्याने त्यांना पगारवाढीची गरज भासत नसावी, हेच त्यांच्या पगारवाढ न होण्याचे कारण असावे.

Advertisement

मात्र रिलायन्स कंपनीने खरोखरच मुकेश अंबानी यांच्यावर दया केली पाहिजे. 11 वर्षांपासून पगार तर नाहीच वाढवला मात्र त्यांना भत्ताही दिलेला नाही. रिलायन्स कंपनीने हा विचार केला पाहिजे की, त्यांनाही मुलेबाळ आहेत, त्यांनाही कुटुंब आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांचा एक भाऊही आहे, जो नेहमी कुटाणे करतो आणि ते मुकेश अंबानींना निस्तारावे लागतात.

Advertisement

असो, आपण एवढे सांगूनही रिलायन्स त्यांचा पगार वाढवणार नसली तरीही आपण एक गोष्ट लक्षात घेणे महत्वाचे आहे. आज ते जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. आणि जगभरात त्यांची ओळख धनकुबेर अशीच आहे. त्यामुळे कुणाला सांगूनही विश्वास बसणार नाही की, हे व्यक्ती गेल्या 11 वर्षांपासून एकाच पगारावर काम करत आहेत.  

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply