Take a fresh look at your lifestyle.

तरीही जग म्हणतेय जुग..जुग..JIO; पहा वैश्विक रँकिंगमध्ये अंबानींची कंपनी कुठे आहे ते

दिल्ली :

Advertisement

रिलायंस कंपनी ही सध्या जगभरात वेगाने फोफावणारी कंपनी म्हणून ओळखली जात आहे. या कंपनीने अनेकांच्या गुंतवणुकीला पावन करून घेत वैश्विक रँकिंगमध्ये मोठी मजल मारली आहे. जिओ या डिजिटल प्लॅटफॉर्मला आता जगभरात महत्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे.

Advertisement

ब्रांड फाइनेंस ग्‍लोबल 500 यांचा 2021 चा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध झालेला आहे. त्यात सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ या ब्रँडने थेट पाचव्या क्रमांकावर उडी घेतली आहे. जगभरातील दिग्गज कंपन्यांना बाजूला सारून अंबानींच्या या ब्रँडने मोठी किमया साधली आहे.

Advertisement

नुकत्याच जिओ कंपनीच्या सेवेबद्दल वाढत्या तक्रारीच्या बातम्या आणि प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी फोर जी सेवेची घोषणा करूनही रेंज मिळत नसल्याच्या तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली आहे. तर, शेतकरी आंदोलनात पंजाब आणि इतर काही भागात जिओ सेवेचे मोबाईल मनोरे उखडून टाकण्यात आलेले आहेत. आतातर 5 जी सेवेमध्ये एअरटेल कंपनीने पहिली चाचणी घेऊन आघाडीही घेतली आहे.

Advertisement

देशात इतके सगळे घडत असतानाही जगभरात जिओचा डंका आहे. त्यामुळेच कंपनीने पाचवी रँक मिळवण्यात यश संपादन केले आहे. रिलायंस ग्रुपसाठी ही खूप मोठी आणि महत्वाची बातमी आहे.

Advertisement

ब्रांड फाइनेंस ग्‍लोबल 500 रँकिंग अशी :

Advertisement
  1. We Chat (चीनी कंपनी)
  2. फरारी (ऑटोमोबाईल कंपनी)
  3. SBer (रशियन कंपनी)
  4. कोका कोला (अमेरिकन कंपनी)
  5. जिओ (रिलायंस ग्रुप, भारत)
  6. डेलोइटी (अमेरिका)
  7. lego (डेन्मार्क)
  8. अमेझॉन (अमेरिका)
  9. डीझ्ने (अमेरिका)
  10. EY (ब्रिटन)

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply