Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : मंत्री तनपुरे यांनाही सहाजणांचे आव्हान; पहा कोण देणार टक्कर

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राहुरी येथील सोसायटी मतदारसंघातून सातजण रिंगणात उतरले आहेत. यातील कितीजण अखेरीस लढणार आणि कोण माघार घेणार हे पुढील १० दिवसात स्पष्ट होईल. मात्र, मंत्री प्राजक्त प्रसाद तनपुरे यांना येथून कडवी टक्कर देण्यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी केली आहे.

Advertisement

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांना या निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी आलेली आहे. त्यामुळेच भाजपतर्फे यंदा येथून अखेरीस उमेदवार कोण राहणार आणि तो मंत्री तनपुरे यांना कशी टक्कर देणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे पुत्र सत्यजित हेही इथून रिंगणात आहेत.

Advertisement

निवडणुकीत फ़क़्त दोन जागा बिनविरोध करणे शक्य झालेले आहे. राहता व शेवगाव येथील जागा बिनविरोध झालेली असतानाही मंत्री असूनही तनपुरे यांना ते राहुरीत शक्य झालेले नाही. उलट सहाजणांनी अर्ज ठेवले आहेत. तनपुरे यांना कडवे आव्हान देण्याची विरोधकांची ही तयारी आहे.

Advertisement

राहुरी येथील सोसायटी मतदारसंघातील उमेदवार असे :

Advertisement
  1. तनपुरे अरुण बाबुराव
  2. बानकर सुरेश पंढरीनाथ
  3. धसाळ तानाजी धोंडीराम
  4. कदम सत्यजित चंद्रशेखर
  5. पाटील सुभाष दत्तात्रय
  6. ढोकणे नामदेव पांडूरंग
  7. तनुपरे प्राजक्त प्रसाद

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply