अहमदनगर :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत यंदा जामखेड येथील सोसायटी मतदारसंघातील जागा कायदेशीर पेचात अडकली होती. त्यामुळे इथून जगन्नाथ राळेभात यांना लॉटरी लागण्याची चर्चा होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही.
अखेरीस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी वैध नामनिर्देशन पात्रांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात जामखेडच्या जागेसाठी ३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता या जागेसाठी निवडणूक होणार हे स्पष्ट झालेले आहे. एकूणच येथील बिनविरोधची चर्चा आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत.
जामखेड सोसायटी मतदारसंघासाठी वैध उमेदवार सूची अशी :
- जगन्नाथ देवराव राळेभात
- अमोल जगन्नाथ राळेभात
- सुरेश महादेव भोसले
अमोल राळेभात आणि भोसले यांचे सूचक एकच असल्याने दोघांचेही अर्ज बाद होण्याची भीती व्यक्त होत होती. अशावेळी मग येथून जगन्नाथ राळेभात बिनविरोध निवडून आले असते. मात्र, तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे येथे आता राळेभात पिता-पुत्र यांच्यापैकी कोण उमेदवारी मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज
- म्हणून झाली सरावासराव सुरू; पहा नेमके काय म्हटलेय सभापती दातेंनी
- तर ‘त्या’ बोअरवेल चालक-मालकांवर होणार कारवाई; पहा नेमका काय झालाय निर्णय