Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ADCC बँकेला हाय कोर्टाची नोटीस; पहा नेमके काय प्रकरण आहे हे

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच आता या बँकेला हाय कोर्टाने नोटीस बजावली आहे. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस आणि नितीन लीमोरे यांनी याचिका दाखल केल्यावर न्यायालयाने ही नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांना सेवानिवृत्त झाल्यावरही मुदतवाढ मिळाली आहे. ही मुदतवाढ नियमानुसार नसल्याचे याचिकेत म्हटले आहे. पात्र अधिकाऱ्यांना डावलून वेळोवेळी वर्पे यांनाच मुदतवाढ दिल्याचे त्यात म्हटले आहे.

Advertisement

न्यायालयाने याप्रकरणी सहकार विभागालाही नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत. बँकचे अध्यक्ष सीताराम गायकर व उपाध्यक्ष रामदास वाघ यांना याप्रकरणी प्रतिवादी करण्यात आलेले आहे. वर्पे यांना पदावरून दूर करतानाच त्यांना दिलेले भत्ते आणि पगार वसूल करण्याची मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील   

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply