ADCC बँक निवडणूक : जामखेड, श्रीरामपूर, नगरच्या हरकतींच्या निर्णयावर ठरणार खरी दिशा..!
अहमदनगर :
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पात्र-अपात्र उमेदवारांची यादी आज प्रसिद्ध होत आहे. त्यामध्ये जामखेड, श्रीरामपूर, नगरच्या हरकतींवर काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण, यातूनच प्रचाराची दिशा स्पष्ट होणार आहे.
श्रीरामूर विविध कार्यकारी सोसायटीमधून अर्ज भरलेल्या दीपक पटारे यांच्या उमेदवारी अर्जावर दुसरे उमेदवार करण ससाणे यांनी हरकत घेतली आहे. पटारे हे अशोक बॅंकेचे थकबाकीदार असल्याचे ससाणे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तर, दुसऱ्या हरकतीत ससाणे यांनी पटारे यांच्या ओबीसी मतदारसंघातील अर्जावरही हाच आक्षेप घेतला आहे.
यातील तिसरी हरकत नगर तालुक्यातील सोसायटी मतदार संघातील उमेदवार सत्यभामाबाई बेरड यांच्या अर्जावर आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत दाखल कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगण्यात आले. तर, चौथी हरकत जामखेडचे उमेदवार अमोल राळेभात यांनी उमेदवार सुरेश भोसले यांच्या अर्जावर घेतली आहे.
भोसले व राळेभात यांचे सूचक व अनुमोदक एकच असल्याबद्दल राळेभात यांचा आक्षेप आहे. पाचवी हरकत जामखेडचे भोसले यांनीच अमोल राळेभात यांच्या अर्जावर घेतली आहे. यातही राळेभात यांच्या अर्जावर सूचक एकच असल्याचा आक्षेप आहे.
हरकतींवर सूनावणी पूर्ण झाली असून आज सकाळी ११ वाजता पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स