ADCC बँक निवडणूक : श्रीगोंद्यात पाचपुते, नागवडे व जगतापही रिंगणात; पहा उमेदवारांची यादी
अहमदनगर :
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत यंदा सर्व जागांसाठी मोठी चुरस आहे. श्रीगोंदा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातही यंदा दिग्गज चार उमेदवार रिंगणात आहेत. यातील कोण अर्ज मागे घेणार आणि कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे आमदार व माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी इथून अर्ज भरलेला नाही. मात्र, माजी आमदार राहुल जगताप आणि त्यांच्या पत्नी प्रणोती यांनी येथून अर्ज भरला आहे. या पती-पत्नीपैकी कोण लढणार हे लवकरच स्पष्ट होईल.
यासह येथील माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनीही अर्ज भरला आहे. तर, वैभव पांडुरंग पाचपुते हेही रिंगणात आहे. या चौघांपैकी कोण अर्ज मागे घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैध उमेदवारी अर्ज असे :
- जगताप राहुल कुंडलिकराव
- नागवडे राजेंद्र शिवाजीराव
- पाचपुते वैभव पांडूरंग
- जगताप प्रणोती राहुल
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स