Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : सूचक एकच, म्हणून कायदेशीर पेच..!

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत एक वेगळाच पेच निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता हा पेच सुटल्यावर कोणाला याचा फायदा होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement

जामखेड तालुक्यातील सोसायटी मतदारसंघाबाबत ही कायदेशीर अडचणीची घटना घडली आहे. या जागेसाठी ३ अर्ज आलेले आहेत. भाजपकडून जगन्नाथ राळेभात व त्यांचे पुत्र अमोल राळेभात यांच्यासह राष्ट्रवादीचे सुरेश भोसले यांनी या जागेसाठी अर्ज दाखल केला आहे.

Advertisement

मात्र, अमोल राळेभात आणि भोसले यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवाजी भोसले यांचीच स्वाक्षरी आहे. दोन्ही अर्जांवर सूचक एकच असल्याने दोघांनीही एकमेकांच्या विरोधात हरकत घेतली आहे. त्यामुळे कोणाचा अर्ज बाद करायचा याबाबत पेच निर्माण झाला आहे. निवडणूक अधिकारी यांनी हा निर्णय राखीव ठेवला आहे.

Advertisement

जर दोघांचाही अर्ज निकाली निघाल्यास त्याचा फायदा थेट जगन्नाथ राळेभात यांना होणार आहे. मग ते एकच या जागेसाठी दावेदार उरत असल्याने ते बिनविरोध निवडून येतील. मात्र, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर हे यावर काय निर्णय देतात यावर पुढील दिशा ठरणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply