अहमदनगर :
जिल्हा बँकेच्या निवडणुकीकडे यंदा सर्वांचे जास्तच लक्ष आहे. कारण यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातलेले आहे. आज (गुरुवार, दि. २८ जानेवारी) सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे.
संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ३१२ उमेदवारांच्या अर्जाची छाणनी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यावर पाच हरकती आलेल्या आहेत. त्यावरही निर्णय घेऊन आज यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. पात्र व अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली आहे.
संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २० फेबुवारीला मतदान होणार आहे. छाननी प्रक्रियेत सहकार कायद्यातील निवडणूक तरतूदीनुसार दाखल अर्जासोबत किरकोळ त्रुटी राहिलेल्या असल्यास काही कालावधी देऊन संबंधीत त्रुटी पूर्ण करून घेण्यात आल्या आहेत. यासाठी संबधित उमेदवारांना काल दुपारी चारपर्यंत वेळ देण्यात आलेला होता. अनेकांनी आपापल्या त्रुटी पूर्ण केलेल्या आहेत.
दरम्यान, सर्व हरकतींवर सूनावणी पूर्ण झाली असून गुरुवारी सकाळी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ लोकप्रिय अॅपद्वारे घुसतोय मालवेअर; पहा कोणती आहेत धोकादायक अॅप्लिकेशन
- बाजारभाव अपडेट : नाशकात टोमॅटो जोरात; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : ‘त्या’ठिकाणी हरभरा 7,000 वर; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : तूर 7,000 च्या पार; वाचा राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात ज्वारी 5000 ने; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट