Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : पाथर्डीत २, तर अकोलेमध्ये ‘हे’ तिघेजण रिंगणात

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीची वैध नामनिर्देशन पत्राची यादी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार पाथर्डीच्या सोसायटी मतदारसंघात २, तर अकोले येथील जागेसाठी तिघेजण रिंगणात आहेत.

Advertisement

पाथर्डी येथील जागेसाठी आमदार मोनिका राजीव राजळे यांच्याविरोधात मथुराबाई संभाजी वाघ यांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे अजूनही येथील जागा बिनविरोध होऊ शकलेली नाही. भाजप व ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटातर्फे आमदार राजळे रिंगणात असल्याने त्यांना बिनविरोधची संधी मिळणार की नाही हे लवकरच स्पष्ट होईल.

Advertisement

तर, अकोले तालुक्याच्या जागेसाठी बँकेचे अध्यक्ष सीताराम कोंडाजी गायकर पाटील यांच्या विरोधात सुरेश संपत गडाख आणि दशरथ नामदेव सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे गायकर यांनाही बिनविरोध होण्याची संधी मिळालेली नाही.

Advertisement

अर्ज मागे घेण्यासाठी अजूनही १२ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या कालावधीत कोणत्या घडामोडी घडतात यावर पुढील गणित ठरणार आहे. एकूणच यंदा विखे गटाला शह देण्यासाठी महाविकास आघाडी जोरदारपणे सरसावली असल्याचे चित्र आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply