Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : मंत्री गडाखांनाही तिघांचे आव्हान; लंघे, जावळे, शिंदे रिंगणात

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर गडाख यांनी वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, यंदा राज्यात मंत्रिपद असूनही नेवासा येथील सोसायटी मतदारसंघाची जागा बिनविरोध करणे शंकरराव गडाख यांना शक्य झालेले नाही.

Advertisement

नेवासा तालुका सोसायटी मतदारसंघातून यंदा मंत्री गडाख यांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या पत्नी रत्नमाला यांचे कडवे आव्हान असणार आहे. तसेच येथून कारभारी जावळे आणि शिवाजीराव शिंदे हेही उमेदवारी करीत आहेत.

Advertisement

अर्ज मागे घेण्यासाठी खूप कालावधी आहे. पुढील दहा दिवसात या चारपैकी कितीजण रिंगणात राहतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. मात्र, एकूणच रंगारंग लक्षात घेता गडाख यांना यंदाची निवडणूक तितकी सोपी असणार नाही असेच चित्र आहे.

Advertisement

नेवासा सोसायटी मतदारसंघातील इच्छूद उमेदवार असे :

Advertisement
  1. गडाख शंकरराव यशवंतराव
  2. शिदे शिवाजीराव लक्ष्मणराव
  3. जावळे कारभारी झुंबरराव
  4. लंघे रत्नमाला विठठलराव

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply