Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : कर्डिलेंच्या विरोधात महिला रिंगणात; पहा कोणते अर्ज ठरलेत वैध ते

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत तिसऱ्यांदा बिनविरोध निवड होण्यासाठी माजी मंत्री शिवाजी कर्डिले प्रयत्नशील आहेत. मात्र, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीने त्यांच्या विरोधात दोन उमेदवारी अर्ज भरून येथील निवडणुकीत रंगत आणली आहे.

Advertisement

कर्डिले यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत नगर सोसायटी मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी तालुक्यातील १०८ पैकी तब्बल १०० सोसायटीचे ठराव बाजूने असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्यांचा विजय एकहाती होणार असेच त्यांचे कार्यकर्त्ये म्हणत आहेत.

Advertisement

तर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आणि महाविकास आघाडीने त्यांना तुल्यबळ लढत देण्याची तयारी केली आहे. तब्बल ६० मतदान मिळवून यंदा कर्डिलेंना जिल्हा बँकेत संचालक म्हणून जाऊ न देण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे.

Advertisement

महाविकास आघाडीकडून येथे सध्या पद्मावती संपतराव म्हस्के आणि सत्यभामाबाई भगवानराव बेरड असे दोन अर्ज आहेत. या दोन महिलांपैकी अखेरीस रिंगणात कोण उरते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply