Take a fresh look at your lifestyle.

ADCC बँक निवडणूक : पारनेरमध्ये 10 जण रिंगणात; आमदार लंके यांना ‘हे’ देणार टक्कर

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठीची उमेदवार यादी छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानुसार आता अर्ज मागे घेण्यापूर्वी पारनेर येथील सोसायटी मतदारसंघाच्या जागेसाठी 10 जण रिंगणात आहेत.

Advertisement

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मोठा कालावधी आहे. त्यामुळे 11 फेब्रुवारी पर्यंत रिंगणात कोण उरते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, सध्यातरी पारनेरच्या जागेसाठी तब्बल 10 जण इच्छुक आहेत. त्यामुळे आमदार निलेश लंके यांना टक्कर द्यायला यापैकी कोण राहणार, याची सगळ्यांना उत्सुकता आहे.

Advertisement

राष्ट्रवादीचे आमदार लंके यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मात्र, त्यांना टक्कर द्यायला अनेकजण इच्छुक असल्याचे चित्र या निवडणुकीत पाहायला मिळत आहे. विद्यमान संचालक उदय गुलाबराव शेळके, सबजीरव गायकवाड आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे हेही रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Advertisement

रिंगणात उरलेले उमेदवार असे :

Advertisement
  1. लंके निलेश ज्ञानदेव
  2. शेळके उदय गुलाबराव
  3. झावरे पाटील सुजित वसंतराव
  4. गायकवाड सबाजीराव महादु
  5. भोसले रामदास हनुमंत
  6. रोहोकले विकास भाऊसाहेब
  7. पठारे मिनाक्षी सुरेश
  8. शिंदे राहुल प्रकाशराव
  9. रणसिंग आनंदराव तात्यासाहेब
  10. बेलकर गंगाराम तुकाराम

 संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply