Take a fresh look at your lifestyle.

2014चे ‘ते’ प्रकरण राज ठाकरेंच्या अंगलट; कोर्टात हजर राहण्याचे आदेश

दिल्ली :

Advertisement

खळखट्याक करत थेट निर्णय घेणारे महाराष्ट्राचे फायरब्रॅंड नेते व मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या स्टाइलने अनेक प्रकरणे हाताळत असतात. लॉकडाउन दरम्यान त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अनेक प्रकरणे सोडवली. मात्र आता अशातच 2014 सालचं एक प्रकरण राज ठाकरेंच्या अंगलट येणार असं दिसत आहे.

Advertisement

मनसेच्या काही आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी २६ जानेवारी २०१४मध्ये वाशी टोल नाक्याची तोडफोड केली होती. हे प्रकरण खूप गाजलं मात्र या प्रकरणी थेट राज ठाकरेंसह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर ३० जानेवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८ व २०२०मध्ये या प्रकरणी राज ठाकरेंना समन्स आणि वॉरंट जारी करण्यात आलं होतं.  

Advertisement

आता या प्रकरणाचे वॉरंट रद्द झाले असले तरी राज ठाकरेंना ६ फेब्रुवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जामीन न घेतल्यानं कोर्टानं तसे आदेश दिल्याचं सांगण्यात येतं आहे. २०१४मध्ये राज ठाकरेंनी सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत टोलनाक्यांच्या विरोधात आंदोलन पुकारलं होतं.    

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply