Take a fresh look at your lifestyle.

‘ऑफलाईन टू ऑनलाईन’वर विद्यार्थी म्हणतात की..; वाचा ‘ब्रेनली’च्या सर्वेक्षणाचे मुद्दे

मागील वर्षी सुरु झालेल्या कोरोना साथीच्या आजारामुळे शाळा बंद झाल्याने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळले. विद्यार्थ्यांचा ऑफलाईन टू ऑनलाईन शिक्षणाचा प्रवास काहीसा खडतर असला तरी सुमारे ५२ टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणातील ऑनलाइन स्वरुपातील परिवर्तन सोपे वाटले. आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन व ऑफलाइन शिक्षणाच्या विविध पैलूंवर सखोल दृष्टीक्षेप टाकण्याच्या उद्देशाने ब्रेनली या जगातील सर्वात मोठा ऑनलाइन लर्निंग मंचाने केलेल्या सर्वेक्षणातून हे निदर्शनास आले आहे.

Advertisement

या सर्व्हेच्या माध्यमातून सुमारे २३०० विद्यार्थ्यांनी मागील वर्षात ऑनलाइन शिक्षण कशा प्रकारे स्वीकारले यावर आपापली मते व्यक्ते केली. ब्रेनलीने नोंदवलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५२.५% नी सांगितले की, हे परिवर्तन सोपे होते तर २७.६% विद्यार्थ्यांनी हे आव्हानात्मक होते, असे म्हटले. २०% ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनी यावर निर्णायक मत दिले नाही.

Advertisement

सर्व्हेमध्ये असे दिसून आले की, ७७.२ टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिकण्यापेक्षा प्रायोगिक शिक्षणाला प्राधान्य दिले. तर २२.८ टक्के विद्यार्थ्यांनी दावा केला की, ऑनलाइन शिक्षण हा जास्त सोयीस्कर पर्याय आहे. प्रॅक्टिकल आणि थिअरेटिक पद्धतींविषयी विचारले असता २५.१% ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले की त्यांनी प्रॅक्टिकल दृष्टीकोनास पसंती दिली तर १८% विद्यार्थ्यांनी थिअरेटिकल दृष्टीकोनाला प्राधान्य दिले. दरम्यान, २९.९% ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनी पुढे जाण्यासाठी संमिश्र पद्धत योग्य असल्याचे म्हटले.

Advertisement

मागील वर्षी, शिक्षकांना शिकवणे सोपे होण्यासाठी विविध पद्धती वापराव्या लागल्या. २८.६% ब्रेनलीच्या विद्यार्थ्यांनी म्हटले की, त्यांच्या शिक्षकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स, स्मार्ट क्लासेस इत्यादीमार्फत तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. तर २७.२% ब्रेनलीचे विद्यार्थी म्हटले की, त्यांनी ग्रुप स्टडी, प्रोजेक्ट आणि ऑनलाइन कम्युनिटी-आधारीत प्लॅटफॉर्मसह एकत्रित शिक्षणाच्या दृष्टीकोनाकडे पाऊल उचलले. २५.२% विद्यार्थ्यानी असेही म्हटले की, शिक्षकांनी वैयक्तिक प्रशिक्षण घेत वर्गातील आव्हाने दूर केली.

Advertisement

ब्रेनलीचे सीपीओ राजेश बिसाणी म्हणाले, “२०२० हे वर्ष जागतिक शिक्षण व्यवस्थेच्या दृष्टीने बदलत्या घडामोडींचे केंद्र होते. या बदलांचा विद्यार्थ्यांवर संमिश्रण परिणाम झाला. संपूर्णपणे डिजिटल शिक्षण पद्धतीत काही फायदेशीर ठरले, तर काही इतर गोष्टीही विचारात घ्याव्या लागतील. नवे शिक्षणाचे मॉडेल यापुढे कसे विकसित होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.”

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply