दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृषी सुधारणा विधेयकाबाबत अजूनही देशभरात तीव्र असंतोष आहे. त्याचाच भाग म्हणून हरियाणा राज्यात सत्तेत असतानाही भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री राजपाल माजरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.
शेतकरी आंदोलनाबाबत भाजपने घेतलेली भूमिका न पटल्याने माजरा यांनी थेट पक्षाला सोडून देत आंदोलकांना पाठींबा असल्याची भूमिका जाहीर केली आहे. कृषी सुधारणा विधेयकाद्वारे सरकारने शेतकऱ्यांच्या हमिभावाचा मुद्दा निकाली काढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एकूणच मोदी सरकारच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या आंदोलनास हिंसक वळण लागले. परिणामी आता याची तीव्रता कमी होईल असे वाटत असतानाच माजरा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने आंदोलकांनी त्यांचे स्वागत केले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| वेबसाईट | फेसबुक पेज | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम